गजानन गुर्जरपाध्ये - लेख सूची

स्फुट

वैयक्तिक आयुष्यात देवावर, नियतीवर श्रद्धा असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक, सामाजिक जीवनात तिची लुडबूड होते तेव्हा चिंता वाटते, वाढते. संघटित धर्मसंस्था सत्तापिपासू लोकांना हमखास आपल्याकडे खेचून घेते आणि मग त्यात राजकारणातील अनिष्ट गोष्टी शिरतात. पाश्चिमात्य राष्ट्रात चर्चचा इतिहास पाहा. आपल्याकडील रथयात्रेपासून सुरुवात झालेल्या घटना पाहून हेच दिसते की जास्त संख्येने लोक आकृष्ट होतात …

शिक्षणाचे वर्तमान – एक टिपण

सध्याच्या, सरकारप्रणित, उपलब्ध असलेल्या एसएससी बोर्डाच्या दिशेने जाणाऱ्या शिक्षणाचे वर्णन ‘हाती धरता रोडका, डोकी धरता बोडका’ या जुन्या खेडवळ म्हणीने करता येईल. रोजगार मिळवून देण्यासाठीही ते हमी देणारे नाही आणि मूल्ये रुजवण्याच्या किंवा संस्कार करण्याच्या नावानेही बोंबच आहे.त्यामुळेच सुस्थितीतल्या पालकांचा कल महागड्या इंटरनॅशनल स्कूल्सकडे झुकत चाललेला दिसत आहे. आता मुंबईतील महापालिकेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळादेखील याच …

द मॅजिशियन – पुस्तक परिचय

कॉम टॉईबिन या आयरिश लेखकाची थॉमस मान याच्या चरित्राचा व वाङ्मयाचा वेध घेणारी ‘द मॅजिशियन’ ही कादंबरी नुकतीच वाचली. नोबेल पारितोषिक विजेत्या थॉमस मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही मी वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष. मला ते ललित-चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसवू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व …

अवास्तव अपेक्षा

स्वायत्त म्हणजे स्वतःवर अवलंबून, स्व-तंत्र! या अर्थाने निवडणूक आयोग, न्यायसंस्था किंवा कोणतीही स्वायत्त म्हटली जाणारी यंत्रणा खरोरच स्वायत्त असू शकेल का हा प्रश्न विचार करण्यासारखा आणि कळीचा म्हणावा असा आहे. सत्तेत असलेल्या सरकारकडून या सर्व यंत्रणांचे प्रमुख नेमले जातात. तेथे नेमणूक करतांना पात्रतेबरोबरच त्या व्यक्तीचा आपल्या हितसंबंधांवर विपरीत परिणाम होणार नाही ना याचा विचार सरकारकडून …